आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास:उमरी येथील जवान मच्छिंद्र मुळे यांचा हृदयविकाराने मृत्यू

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथे कर्तव्यावर असलेले सैन्यदलातील हवालदार मच्छिंद्र मुरलीधर मुळे (३८) यांचे मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी केज तालुक्यातील उमरी येथे मूळ गावी कळताच शोककळा पसरली आहे.

मच्छिंद्र मुरलीधर मुळे यांनी सैन्यदलात १८ वर्षे देशसेवा केली होती. ते पुणे येथे सैन्यदलात हवालदार पदावर कर्तव्यावर असताना मंगळवारी रात्री ७ वाजता ते क्वार्टरवर जेवणासाठी आले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मिलिटरीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मोठे बंधू प्रकाश मुळे हे आसाम येथे सैन्यदलात कार्यरत असून त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे उमरी गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...