आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:पाइपलाइन खोदताना जेसीबीने चिरडले; पित्याचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर

गेवराई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साखरझोपेतच घातला काळाने घाला

शेतातील विहिरीवरून पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम काम सुरू असताना रात्री शेतात बाजूलाच झोपलेले पिता-पुत्र जेसीबीखाली चिरडले गेल्याची दुर्दैवी घटना रविवारी गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथे घडली. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी आहे. दरम्यान, जेसीबीचालक फरार झाला आहे.

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर मारफळा तांडा आहे. येथील साहेबराव रूपा राठोड व त्यांचा मुलगा मनोज साहेबराव राठोड यांनी तांड्यापासून जवळच असलेल्या आपल्या शेतात विहिरीवरून पाइपलाइनचे काम रविवारी रात्री सुरू केले. त्यासाठी तालुक्यातील बोरगाव येथून जेसीबी मागवला होता. रात्री काम चालू असताना साहेबराव आणि मनोज दोघेही शेतातच एका बाजूला झोपले होते. रात्री काम सुरू असताना चालकाच्या लक्षात न आल्यामुळे जेसीबी थेट झोपलेल्या पिता-पुत्राच्या अंगावरून गेला. या दुर्घटनेत पिता साहेबराव जागीच ठार झाले, तर मनोज गंभीर जखमी झाला. त्याला त्याला बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घटनास्थळी तलवाडा ठाण्याचे सपोनि सुरेश उणवणेसह पोलिस कर्मचारी दाखल झाले होते. 

मृत साहेबराव राठोड यांचे जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी जखमी मुलगा मनोज यास मारफळा तांडा येथे आणले होते. या प्रकरणी जेसीबीचालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...