आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन‎:अट्टलमध्ये जिजाऊ-सावित्री-फातिमा‎ व्याख्यानमालेचे आजपासून आयोजन‎

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,‎ र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,‎ गेवराई येथे ‘जिजाऊ - सावित्री - फातिमा‎ व्याख्यानमाला-२०२३’ चे आयोजन करण्यात आले‎ आहे. ३ जानेवारी २०२३ रोजी ‘इतिहासातील‎ महानायिका आणि वर्तमान वास्तव’ या विषयावर‎ व्याख्यान होणार आहे. चंद्रशेखर शिखरे हे पहिले विचार‎ पुष्प गुंफणार आहे.

दुसरे पुष्प ४ जानेवारी २०२३ रोजी‎ आयोजित असून प्रा. सुशीला मोराळे या ‘जिजाऊ -‎ सावित्री - फातिमा यांच्या कार्याची प्रस्तुतता’ या‎ विषयाच्या अनुषंगाने बोलणार आहेत. यावेळी श्रोत्यांनी‎ व्याख्यानमालेसाठी दोन्ही दिवशी उपस्थित राहावे, असे‎ आवाहन व्याख्यानमालेच्या संयोजक प्राचार्य रजनी‎ शिखरे आणि ‘जिजाऊ - सावित्री - फातिमा‎ व्याख्यानमाला’ समितीचे डॉ. समाधान इंगळे, डॉ. मीना‎ नागवंशी, डॉ. रेवणनाथ काळे, डॉ.राहुल माने यांनी केले‎ आहे. महाविद्यालयाच्या गोदावरी सभागृहात सकाळी ११‎ वाजता ही व्याख्यानमाला संपन्न होईल.‎

बातम्या आणखी आहेत...