आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिग:राज्यातील ग्रामीण भागात कार्यरत 597 कंत्राटी आरोग्यसेविकांच्या नोकरीवर टांगती तलवार

बीड / अमोल मुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याकडून ३,२०७ पदांसाठी प्रस्ताव, केंद्राकडून मात्र २,६१० पदांनाच मंजुरी

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून राज्यातील ग्रामीण भागात कार्यरत ५९७ कंत्राटी आरोग्यसेविकांच्या नोकरीवर गदा आली आहे. ३१ ऑगस्टपासून त्यांच्या सेवा थांबवण्यात येणार आहेत. केंद्राने राज्याच्या आराखड्यातील या पदांची संख्या कमी केल्याचा फटका आरोग्यसेविकांना बसला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्र स्तरावर कंत्राटी आरोग्य सेविकांची निवड झालेली आहे. प्रत्येक वर्षी त्यांचे कंत्राट ११ महिन्यांसाठी नूतनीकरण केले जाते. यासाठी केंद्राकडून दरवर्षी पदे व वेतनासाठीच्या आर्थिक आराखड्याला मंजुरी मिळायची. २०२१-२२ आर्थिक वर्षांसाठीचा बिगर आदिवासी क्षेत्रासाठीचा ३,२०७ आरोग्यसेविकांच्या पदांचा आराखडा राज्याने मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला. यातील २,६१० पदांना मंजुरी दिली तर ५९७ पदांना मंजुरी नाकारलेली आहे. त्यामुळे, आता राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांची नोकरी यामुळे जाणार आहे. ३१ ऑगस्टपासून या आरोग्य सेविकांच्या सेवा थांबवण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी काढले आहेत.

कोणती पदे रद्द केली जाणार?
जिल्ह्यात एनएचएमधील आरोग्य सेविकांची रिक्त पदे प्राधान्याने रद्द केली जातील.

पदे रिक्त नसल्यास नोकरी जाणार?
पदे रिक्त नसल्यास मागील एक वर्षात एकही बाळंतपण न झालेल्या आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविकेचे पद रद्द केले जाईल.

बाळंतपण न होणारी आरोग्य केंद्रे जास्त असल्यास?
बाळंतपण न होणाऱ्या केंद्रांची संख्या रद्द होणाऱ्या पदांपेक्षा अधिक असेल तर २०११ च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या उपकेंद्राचे पद रद्द केले जाईल.

१० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे लागणार
पद रद्द झालेल्यांना यापुढेही एनएचएममध्ये कामाची इच्छा असल्यास १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत. त्यांना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातील रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेने व समुपदेशनाने नियुक्त्या मिळतील. पदे रिक्त नसल्यास अर्ज आरोग्य सहसंचालक (अतांत्रिक) यांच्याकडे जातील.

कोणत्या जिल्ह्यात किती पदे रद्द
ठाणे ३, रायगड २१, पालघर १, नाशिक १९, धुळे १०, जळगाव १९, अहमदनगर २९, पुणे १६, सोलापूर ३९, सातारा २९, कोल्हापूर ३९, सांगली २३, सिंधुदुर्ग २१, रत्नागिरी १९, औरंगाबाद ८, जालना १०, परभणी १९, हिंगोली १२, लातूर २२, उस्मानाबाद १६, बीड ३०, नांदेड ३७, अकोला १३, अमरावती १९, बुलडाणा २४, वाशिम ९, यवतमाळ २१, नागपूर २४, भंडारा ११ वर्धा २२, चंद्रपूर ११

बातम्या आणखी आहेत...