आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध प्रकरणात जिल्हा प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन कारवाई न करता वेळ काढूपणा करत असल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपा काढो आंदोलन करण्यात आले.
जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब, बालाघाटावरील डोंगर भागातील अवैध गौणखनिज उत्खनन, वनविभागातील गैरव्यवहार बीड शहरातील रखडलेले अमृत अटल योजना व भुयारी गटार योजना तसेच बिंदुसरा व कर्परा नदीपात्रातील अतिक्रमित बांधकाम, शहरातील बेकायदेशीर होर्डिग्ज व बॅनर आदि प्रकरणात वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा जाणीवपूर्वक कारवाईस दुर्लक्ष केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपा काढो आंदोलन केले. यावेळी रामनाथ खोड, शेख युनुस चऱ्हाटकर, शेख मुबीन, शेख मुश्ताक, मिलिंद सरपते, देवा गुंजाळ, प्रदिप औसरमल आदी सहभागी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.