आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे व्यंकटेश पब्लिक स्कुल मध्ये माता-पालकांसाठी संगीत खुर्ची व उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हळदी कुंकू व माता पालक मेळाव्याच्या निमित्ताने केलेल्या या कार्यक्रमात महिलांमध्ये उखाण्यांची जुगलबंदी चांगलीच रंगली. स्वाती ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिल्पा शेटे या उपस्थित होत्या. प्रास्ताविक विद्या पवार यांनी केले.
धार्मिक रूढी जपायची म्हणून हा हळदी कुंकू कार्यक्रम नाही तर त्यानिमित्ताने आपल्यातील कौशल्य, कलागुण तसेच वैचारिक आणि बौद्धिक विचार प्रकट व्हावेत व नवनवीन संकल्पनांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी आपण सर्व जणी एकमेकींना भेटत असल्याचे स्वाती ठोंबरे म्हणाल्या. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या उखाणे स्पर्धेत फकीर जवळा येथील गुलनाज सय्यद यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गुलनाज यांनी निर्धारित वेळेत मराठी व हिंदी भाषेतून अनेक उखाणे सादर केले. दिंद्रुडच्या रुपाली सोळंके यांनी दुसरा क्रमांक मिळवला.
संगीत खुर्चीच्या खेळात बाभळगावच्या सरस्वती लाटे यांनी बाजी मारली. जवळा येथील दीपाली खांडेकर यांचा दुसरा नंबर आला. विजयी स्पर्धकांना प्रथम बक्षीस म्हणून साडी तर द्वितीय बक्षीस म्हणून चांदीचे नाणे भेट स्वरूपात देण्यात आले. आजच्या युगात स्त्रियांनी स्वावलंबी होणे ही काळजी गरज आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहून कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन शिल्पा शेटे यांनी केले.
चूल आणि मूल आपले आद्य कर्तव्य आहे मात्र आपल्या मनातील आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे आलं पाहिजे असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता ठोंबरे यांनी तर आभार अयोध्या लाटे यांनी मानले.॰ प्रदीप ठोंबरे व बंडू खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रदीप देशमाने, उपप्राचार्य भीम मस्के, सबीर कराडो, नितीन ठोंबरे, अयोध्या लाटे, माया सोळंके, संध्या राणी सटाले, अमृता काकडे, गीता देशमुख, मनीषा रायकर, शांताबाई भंडारी, योगेश ठोंबरे आदींनी कार्यक्रम यशस्वी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.