आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:वाढदिवसाचे औचित्य साधून ; विस्तार अधिकारी जाधव यांच्याकडून शाळेला सिमेंटचे बाकडे सप्रेम भेट

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उत्तरेश्वर जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाटोदा शाळेला ७ सिमेंट बाकडे भेट देण्यता आले. शाळेच्या वतीने प्राचार्य धनवंत मस्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यता आला. या वेळी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या शाळेत मी शिकलो त्यामुळे आज या पदावर जाऊ शकलो असे ते म्हणाले.

इतरांनीही शाळेला वस्तू देऊन वाढदिवस साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी, माऊली वनवे, सी. एम. पाटील, एन. आर. बहिर, प्रवीण तुपे, गणेश जाधव, महादेव जाधव, राहुल वाघमारे, हनुमंत जाधव, एकनाथ जाधव, महादेव माने, बाबू बडगे, मच्छिंद्र तुपे, वैभव वनवे उपस्थित होते. बी.आर चोरमळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार मांडले.

बातम्या आणखी आहेत...