आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पुरवठा:केज, धारूर शहरासह बारा‎ गावांचा पाणी पुरवठा सुरळीत‎

केज‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यूत बिलाची थकबाकी‎ भरण्यासंदर्भात नोटीस देऊन दिरंगाई‎ होऊ लागल्याने विद्युत महावितरण‎ कंपनीने नेहमीचा ‘फंडा'' वापरून‎ विद्युत कनेक्शन करीत ‘शॉक''‎ दिला. त्यानंतर खडबडून जागे‎ झालेल्या धारूर नगर परिषदेने ७‎ लाख रुपयांची तर केज‎ नगरपंचायतीने ५ लाख रुपयांची‎ तरतूद करीत १२ लाख रुपयांचा‎ भरणा केला. मग महावितरणने‎ विद्युत कनेक्शन जोडत विद्युत‎ पुरवठा सुरू केला.

पाच दिवसांनी‎ केज, धारूर शहरासह १२ गाव‎ योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत‎ झाला आहे.‎ धनेगाव (ता. केज) येथील‎ मांजरा धरणावरून केज, धारूर या‎ शहरासह ग्रामीण भागातील १२‎ गावांसाठी एकच पाणी पुरवठा‎ योजना कार्यान्वित आहे. तर पाणी‎ उपसा करणाऱ्या विद्युत पंपास‎ लागणाऱ्या विजेच्या पुरवठ्यापोटी‎ विद्युत महावितरण कंपनीची‎ कोट्यवधी रुपयांची थकबाकी‎ थकीत आहे. प्रत्येक वर्षी‎ महावितरण कंपनीकडून थकीत‎ रक्कम भरण्यासंदर्भात नोटिसाद्वारे‎ सूचना केली जाते.

बातम्या आणखी आहेत...