आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुगौरव:राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने कैलास तुपे यांचा सन्मान‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘राष्ट्र देवो भव:’ हे ब्रीदवाक्य उराशी‎ बाळगून कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय‎ दर्जा प्राप्त मनुष्यबळ विकास अकादमी‎ मुंबई यांच्याकडून दिला जाणारा‎ मानाचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक‎ गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार‎ शिवचरित्रकार कैलास तुपे यांना‎ नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारक‎ भवनात प्रदान करण्यात आला.‎

वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी‎ राबवण्यात येत असलेल्या‎ उपक्रमाबद्दल हा पुरस्कार देण्यात‎ आला.‎ राष्ट्रीय कीर्तनकार शामसुंदर महाराज‎ सोन्नर, शिक्षण तज्ज्ञ मोनिका याशोद,‎ ‎ महापरिषद समन्वयक मनीषा कदम,‎ समुपदेशिका मीनाक्षी गवळी,‎ व्यंगचित्रकार गणेश जोशी,‎ ॲड.कृष्णाजी जगदाळे, किसनराव तुपे‎ यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट‎ कार्याबद्दल कैलास तुपे यांना प्रदान‎ करण्यात आला आहे.

मराठी साहित्य‎ क्षेत्रातील साहित्य शिरोमणी, शब्दप्रभू‎ कुसुमाग्रजांच्या जन्मभूमीत आपल्याला‎ सन्मानित करण्यात आले, याचा आनंद‎ वाटतो असे मत कैलास तुपे यांनी‎ व्यक्त केले. ग्रामीण वस्तीवरील‎ विद्यार्थी इयत्ता पाचवी, आठवी‎ स्कॉलरशिप परीक्षा, एनएमएमएस‎ परीक्षा, मंथन, एमटीएस या परीक्षेत‎ यशस्वी व्हावेत, यासाठी तुपे यांनी‎ विशेष प्रयत्न केले.

यासह शालेय स्पर्धा ‎ ‎ परीक्षा, क्रीडा, साहित्, चित्रकला,‎ वक्तृत्व, निवेदन, अभिनय, पथनाट्य ‎ ‎ यासारख्या अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांना ‎ ‎ सामील करून घेण्यासाठी त्यांनी विशेष ‎ ‎ प्रयत्न केले. कविता लेखन,‎ कथाकथन, सूत्रसंचालन शैली‎ विकसित केली. महाराष्ट्र युवा वक्ता‎ २०२०, यशवंत रत्न राज्यस्तरीय आदर्श ‎ ‎ शिक्षक पुरस्कार २०१९, सातारा जिल्हा‎ युवा वक्ता २०१०, सिद्धेश्वर सामाजिक ‎प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्कार २०१७ ‎ ‎ सावरगाव चकला प्रतिष्ठान आदर्श‎ शिक्षक पुरस्कार २०१८, गुणवंत शिक्षक‎ पंचायत समिती पाटण जिल्हा सातारा‎ या सारख्या अनेक पुरस्कारांनी कैलास‎ ‎ तुपे हे सन्मानित झालेले आहेत. बीड‎ जिल्ह्यातील वस्तीशाळेवरील‎ शिक्षकाच्या कार्याचा सन्मान‎ ‎झाल्याबद्दल तुपे यांचे या निवडीबद्दल‎ सहकारी, मित्रपरिवार व जिल्हाभरातून‎ अभिनंदन करण्यात येत आहे.‎ कैलास तुपे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.‎

प्रेरणेतून राष्ट्र मोठे होते
‎पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र‎ मोठे होते. प्रयत्न, जिद्द, चिकाटी व‎ सातत्य या चार स्तंभांना आत्मसात‎ करणारा कोणताही व्यक्ती ध्येय‎ प्राप्त करतोच. आजच्या गुणवंत‎ बांधवांनो तुमच्या अंगभूत कला‎ कौशल्याचा वापर करून भावी पिढी‎ सामर्थ्यवान बनवा. अन् राष्ट्रीय‎ जबाबदारी पूर्ण करा, असे मत‎ मोनिका याशोद यांनी व्यक्त केले.‎ कृष्णाजी जगदाळे यांनी महाराष्ट्र‎ साहित्य व अध्यात्मिक विषयावर‎ मार्गदर्शन केले. शिक्षकांचे कार्य हे‎ मोलाचे असल्याचे सांगितले. तसेच‎ पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...