आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाजोगाई पीपल्स को ऑप बँक सन २०२२ हे बँकेचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करत आहे . गढीपाडवा व बँकेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने कलारंजना मुंबई निर्मित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीच्या महाकलाविष्काराचे आयोजन सोमवारी, दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आल्याची माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे .
या सांस्कृतिक कलाविष्काराची निर्मिती उदय साटम यांनी केली असून त्याचे व्यवस्थापन जयेश निकम यांनी सांभाळले आहे . कार्यक्रमाचे निवेदन दत्ता चाळके हे करत आहेत. या कलाविष्कारात वादक म्हणून सचिन घाग, शरद वाणी, पार्थ पाटील, रवी खानविलकर, अनिकेत गंगावणे तर गायनाची जवाबदारी दिनेश नादकर, ऋषी मेस्त्री, दर्शन साटम, उमा गावड, श्रद्धा साळवी सांभाळली आहे. नृत्य दिग्दर्शकाची भूमिका संदीप कांबळे हे पार पाडत आहेत.
लावणी अंबिका पुजारी यांच्या समवेत स्वाती बडेकर, प्रियंका कोरी, पूजा मोहिते, मोहिनी पवार, नैना परुळेकर, नीलेश पंडव, राजेश शिर्के, नंदू कदम, उज्वेश, आतिष हे सादर करणार आहेत. अंबाजोगाई पीपल्स बँक ही नावाप्रमाणेच लोकांचे हित जोपासण्याचे काम सदैव करत आली आहे. बँकेने मागील पंचवीस वर्षांत अर्थकारण तर केलेच मात्र अर्थकारण करताना समाजकारण करण्याचे विसरली नाही. अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या माध्यमातून राजकिशोर मोदी यांनी हजारो बेरोजगार युवकांना कामाला लावले आहे.
हजारो फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी बँकेच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्याचा हात पुढे केला आहे . मागच्या कोरोना महामारीच्या काळात अंबाजोगाई पीपल्स बँक व राजकिशोर मोदी मित्रमंडळ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करून जवळपास ११०० बॅग रक्त संकलन केले होते . तसेच लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार व गरजवंतांना ७ हजार अन्न धान्याच्या किट्सचे वाटप देखील करण्यात आले. कोरोना महामारीत आपल्या जिवाची तमा न बाळगता रुग्णसेवा केली आहे, अशांना कोविडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर, शिक्षक, पोलिस, महसूल कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, तसेच आरोग्य व स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.