आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिसभेवर‎:कालिकादेवी महाविद्यालयाचे ्प्राचार्य‎ डॉ. कंधारे विद्यापीठ अधिसभेवर‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎ विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत कालिकादेवी‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास शामराव कंधारे‎ हे १३ मतांचा कोटा पूर्ण करून विजयी झाले आहेत.‎ कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली‎ निवडणुक प्रक्रिया राबण्यिात आली. या निवडणुकीत‎ विजयी झालेल्या १८ उमेदवारात बीड जिल्ह्यातील ८‎ जणांचा समावेश आहे.

शिरूर येथील कालिकादेवी‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्चास कंधारे हे खुल्या‎ गटातून कोटा पूर्ण करून विजयी झाले. माजी मंत्री‎ जयदत्त क्षीरसागर, आमदार सतीश चव्हाण, आमदार‎ विक्रम काळे, संस्था सचिव डॉ.भारतभूषण‎ क्षीरसागर, डॉ.दीपा क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर,‎ डॉ.राजीव मचाले, योगेश पवार, डॉ.मधुकर राजपांगे,‎ डॉ. आबासाहेब, डॉ.शिवानंद क्षीरसागर यांनी त्यांचे‎ अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...