आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन भारत:बीड जिल्ह्यातील 1200 लोकसंख्येचे काळवाडी गाव कोरोनाच्या बाबतीत ठरले आदर्श, येथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही

दिनेश लिंबेकर | बीड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दर 8 दिवसांनी होते सॅनिटायझेशन, सीसीटीव्हीद्वारे बाहेरून येणाऱ्या लोकांवर ठेवली जाते नजर

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील १२०० लोकसंख्येचे गाव काळवाडी. हे गाव सजगतेबद्दल संपूर्ण भागात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या बाबतीतही हे गाव आदर्श ठरले आहे. तेथे आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मास्क घालणे अनिवार्य आहे. सीसीटीव्हीद्वारे बाहेरून येणाऱ्या लोकांवर नजर ठेवली जाते. फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा नियम तोडणाऱ्या लोकांना एक हजार रुपयांचा दंड लावला जातो. दर आठ दिवसांत गावातील प्रत्येक घराचे सॅनिटायझेशन केले जाते. एवढेच नाही तर या गावाने ३० लाख रुपयांचे बक्षीस असलेली स्मार्ट गाव स्पर्धा जिंकली आहे.याच रकमेतून ३ किलोवॅटचे सोलर हीटर, आरओ प्लँट लावलेला आहे. ५ रुपयांत आरओचे २० लिटर पाणी पिण्यासाठी दिले जाते. गाव वीजनिर्मितीही करते. गावात १२० सौरदिवे आहेत. २०१७-१८ मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक मिळवला. पाच वर्षांत भांडण-हाणामारीची एकही घटना नाही.

प्रत्येक घर गुलाबी, प्रत्येक कुटुंब एक झाड लावून त्याची देखभाल करते

समाजात बंधुभाव कायम राहावा यासाठी सर्व घरे गुलाबी रंगाने रंगवली आहेत. प्रत्येक घराच्या दारावर पती-पत्नी दोघांचेही नाव आहे. प्रत्येक कुटुंब एक झाड लावून त्याची देखभाल करते. गावातच गांडूळ खत तयार केले जाते.

बातम्या आणखी आहेत...