आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गवसणी:कल्याणीचा एमडी मेडिसिनला प्रवेश निश्चित,  2352 रँक मिळवून घातली यशाला गवसणी ; वृत्तपत्र वितरक चव्हाण यांची मुलगी डॉ. कल्याणीचे स्वागत

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. कल्याणी सुदाम चव्हाण हीने वैद्यकीय पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पदव्युत्तर वैद्यकीय पदवी प्रवेशपूर्व ( NEET PG ) परीक्षेत घवघवीत यश मिळविले. तिने ८०० पैकी ५७८ गुण मिळवले. देशात २३५२ असा रँक मिळवून एम. डी. मेडिसिनसाठी प्रवेश निश्चित केला. डॉ . कल्याणी चव्हाण ही येथील ‘दिव्य मराठी'चे वितरक सुदाम चव्हाण यांची मुलगी आहे. तिने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी - ( एमबीबीएस ) मिळविली. त्यानंतर तिची अंतरवासिता सुरु असतानाच तिने मागच्या वर्षी नीट पीजी परीक्षा दिली होती. त्यातही तिला चांगला रँक मिळून कान नाक घसा ( ईएनटी ) . या विषयात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश मिळाला होता. मात्र , तिला एम.डी. मेडिसिन करायचे असल्याने तिने पुन्हा तयारी केली आणि तिचे स्वप्न पूर्ण झाले. शिक्षण काळातही ती वडिलांना वृत्तपत्राच्या व्यवसायात हातभार लावत असे . आता तिच्या गावातील ती एकमेव डॉक्टर असणार आहे. या यशाबद्दल तिचे व वडील सुदाम चव्हाण यांचे अभिनंदन होत आहे.

कल्याणी लहाणपणा पासूनच खूप मेहनती आणि अभ्यासु आहे. माझा न्युज पेपरचा स्टॉलवर शाळा करून दुपारी दोन तास रोज वडिलांच्या कामातही ती हातभार लावत असत. त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करत तू यश मिळवलेस. चव्हाण परिवारात व गावातही आजपर्यंत प्रथम तू यश मिळवलस. खरच लेकी मी भारावून गेलो! मला काय लिहावे सूचत नाही. असो, तू देशात उत्कष्ट डॉक्टर व्हावे समाज सेवा हाच आपला धर्म समजून रुग्णांना सेवा घावी. तुझ्या हातांनी देशसेवा घडो हीच तुझ्याकडून अपेक्षा. अशा शुभेच्छा वडील सुदाम चव्हाण यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...