आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:शिरूर येथील कानिफ विघ्नेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आनंदगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधरचे जिल्हा कार्याध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख असलेले कानिफ विघ्ने यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या खासदार रजनी पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील, राहुल सोनवणे, शिरूर तालुकाध्यक्ष रमेश सानप यांच्या मार्गदर्शनात शिरूर तालुका काँग्रेस कमिटीमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख व शिरूर तालुका अध्यक्ष रमेश सानप यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते विघ्ने यांचा सत्कार करण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये शिरूर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष रमेश सानप यांच्या नेतृत्वाखाली संघटन बळकट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेईल, अशी ग्वाही विघ्ने यांनी दिली. यावेळी राहुल मोरे, विधी सेल प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश कारांडे, अंबाजेागाई तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर शिंदे, बीड तालुका काँग्रेसचे नेते अध्यक्ष गणेश बजगुडे, राहुल मोरे, बीड सरचिटणीस आकाश म्हस्के, संतोष निकाळजे, जयप्रकाश आघाव, विष्णू मस्के, अशोक देशमुख, ऋषभ कोठारी, हनुमान घोडके आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...