आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद द्वारा आयोजित अविष्कार २०२२-२३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाच्या तीन संघांनी सहभाग नोंदवला. यामध्ये फाईन आर्ट या विभागामध्ये महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी पवन कपाळे यास गोल्ड मेडल मिळाले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रीती पोहेकर यांच्या हस्ते सर्व यशस्वी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
कला शाखेचा प्रथम वर्षा पवन कपाळे आणि वाणिज्य प्रथम वर्षाची विद्यार्थिनी सलोनी शर्मा यांनी सहभाग नोंदवला. यात बिंदुसरा नदीपात्रातून विविध आकाराचे दगड गोटे जमा करून त्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. महाविद्यालयात हा उपक्रम गेले १० वर्षापासून राबवण्यात येत आहे. यामध्ये कागदापासून, शाडूच्या मातीपासूनही गणेश मूर्ती बनवण्यात आल्या आहेत.
शहर पातळीवर याचे प्रदर्शन आणि कार्यशाळा दरवर्षी आयोजित केली जाते. महाविद्यालयाचे विद्यार्थी शुभम खाटीकमारे, स्वराज्य काशीद ,सचिन बहिरे, तन्मय कुलकर्णी यांचेही उत्तम सादरीकरण झाले. अविष्कार २०२३ साठी प्रा. विशाल नाईकनवरे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. तसेच डॉ. जोगेंद्र गायकवाड यांनी संस्कृती आणि पर्यावरण यांच्या समतोलासाठी निसर्गाचा वापर या प्रथम पुरस्कार आणि गोल्ड मेडल प्राप्त प्रोजेक्टचे मार्गदर्शक म्हणून काम केले. प्रा. डॉ. रूपाली कुलकर्णी यांनी अविष्कार २०२३ च्या सहभागी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी विशेष मेहनत घेतली. तसेच अविष्कार सेल मधील सर्व प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन उत्तम तयारी करून घेतली. प्रथम पुरस्कार आणि गोल्ड मेडल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे संस्थेच्या व महाविद्यालयीन प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.