आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासापासून वंचित‎:कपिलधारवाडी हे‎ छोटे गाव; पर्यटनस्थळ असलेले कपिलधारवाडी विकासापासून वंचित‎

बीड‎एका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ शहरापासून जवळ असलेल्या आणि‎ पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या‎ कपिलधार येथील कपिलधारवाडी हे‎ छोटे गाव मात्र विकासापासून वंचित‎ असल्याचे चित्र आहे. पर्यटनस्थळ‎ म्हणून कपिलधार धबधबा प्रसिद्ध‎ असला तरी गावाचा विकास मात्र‎ झालेला नाही.‎ बीड शहरापासून अवघ्या २०‎ किलोमिटर अंतरावर कपिलधार हे‎ ठिकाण आहे. दरित मन्मथस्वामींची‎ समाधी असून या समाधी स्थळाजवळ‎ उंच धबधबा आहे. हे ठिकाण असलेले‎ गाव म्हणजेच कपिलधार वाडी आहे.‎ अवघ्या ४५० लोकसंख्येचे गाव उंच‎ धबधब्यामुळे राज्यभर ओळखले जाते.‎

राज्यभरातून पर्यटक कपिलधार‎ धबधबा पाहण्यासाठी येत असतात तर‎ संत मन्मथस्वामींच्या यात्रेसाठी‎ कर्नाटक, आंध्रप्रदेशातून लाखो भाविक‎ दरवर्षी जमा होतात. पर्यटकांमुळे‎ गावातील नागरिकांना काहीसा रोजगार‎ मिळाला असला तरी साडेचारशे‎ लोकसंख्येचे हे गाव विकास‎ कामांपासून दूर आहे.

पर्यटनस्थळ‎ म्हणून कपिधार धबधब्याजवळ काही‎ कामे झाली मात्र त्याचा कपिलधारवाडी गावाला फायदा नाही. गावातील अंतर्गत ‎रस्ते, नाल्या, यासह इतर प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.‎ या गावात सेन्टेन्स सोशल सेंटर सामाजिक संस्थेच्या वतीने काम सुुरु ‎ करण्यात आले आहे. नागरिकांना‎ अनेक समस्यांचा सामना करावा‎ लागत आहे, ही बाब सामाजिक‎ कार्यकर्ते मनीषा स्वामी, रेवती धिवार,‎ ज्योती वाघमारे, विनोद शिंदे, मनीषा ‎घुगे, राजश्री सांगळे यांच्या निदर्शनास‎ आली. पावसाळा सुरु झाला की उंच‎ डोंगरावरून येणारे दगड घरावर येऊन‎‎ पडतात.

यासाठी गावकऱ्यांनी मिळून‎ एक नाला तयार केला होता. तो आता‎ भरून गेला आहे. दरी मध्ये उतरून‎ पाणी पिण्यासाठी आणावे लागते.‎ पिकाची काढणी झाल्यानंतर माल‎ उंचावर कपिलधार वाडी या ठिकाणी‎ आणवा लागतो.‎ चांगला रस्ता नाही. सार्वजनिक‎ शौचालय नाही. गावात चौथीपर्यंत‎ शाळा असून पुढील शिक्षणासाठी‎ विद्यार्थ्यांना मांजरसुंबा येथे जावे‎ लागते. एसटीचीही सुविधा नाही. ८‎ किमीचा रोजचा प्रवास विद्यार्थ्यांना‎ करावा लागतो. वारंवार मागणी‎ करुनही अद्याप महामंडळाने एसटी‎ सुरु केलेली नाही.‎

बातम्या आणखी आहेत...