आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडधड‎:करिनाच्या उमेदवारीने अनेकांच्या उरात धडधड‎

मानोरा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानोरा‎ तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत ‎असलेल्या खापरदरी येथील‎ तृतीयपंथी ज्ञानेश्वर बळीराम आडे‎ उर्फ करिना यांनी रीतसर‎ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी‎ उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ‎त्यांच्या आवाहनामुळे निवडणुकीत‎ चुरस वाढली आहे.‎ भारतीय लोकशाहीने देशातील ‎महिला आणि पुरुष नागरिकांना‎ मतदान करण्याचा आणि निवडणूक ‎प्रक्रियेत उमेदवार म्हणून उभे‎ राहण्याचा अधिकार प्रदान केलेला‎ आहे. परंतु पुरुष आणि महिला ह्या‎ दोन्हीही प्रवर्गामध्ये समाविष्ट‎ ‎नसलेल्या आणि तृतीयपंथी‎ असणाऱ्या नागरिकांनाही आता‎ लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये‎ लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहून नागरिकांच्या सेवा करण्याची संधी‎ आपल्या देशामध्ये उपलब्ध झालेली‎ आहे.

ज्याचा प्रत्यय मानोरा‎ तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या‎ ग्रामपंचायत निवडणुकीत येत आहे.‎ ज्ञानेश्वर बळीराम आडे उर्फ‎ करिना या खापरदरी येथील मूळ‎ नागरिक असून तृतीयपंथी‎ असल्याने ते राज्यातील‎ महानगरांमध्ये सामाजिक आणि‎ इतर सेवा कार्य मागील काही‎ वर्षांपासून करीत आहे. परंतु‎ आपल्या मूळ गावाशी आणि‎ समाजाशी काहीतरी उत्तरदायित्व‎ असल्यामुळे लोकशाही पद्धतीने‎ निवडणुकीला उभे राहून वंचित‎ आणि दुर्बल घटकांचा विकासाला‎ प्राधान्य देणार असल्याचे मत‎ ज्ञानेश्वर आडे उर्फ करिना यांनी‎ प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...