आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ:करुणा शर्मा परळीत येताच महिलांनी रोखले; कारमध्ये सापडले पिस्टल, धावत्या कारमध्येच महिला काही ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

परळी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे होत न्यायालयीन लढाई सुरू असलेल्या करुणा शर्मा रविवारी थेट परळीत दाखल झाल्या. त्या पत्रकार परिषद घेणार होत्या, मात्र तत्पूर्वीच परळीतील महिला कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. यानंतर गोंधळ निर्माण झाला. शर्मा यांच्या कारच्या तपासणीत एक पिस्टल आढळले. दरम्यान, शर्मा यांच्या वाहनाच्या डिकीत एक महिला काहीतरी वस्तू ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याच डिकीत पिस्टल आढळल्याने ठेवलेली ती वस्तू पिस्टल होती का, वस्तू ठेवणारी ती महिला कोण, हे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. अवघ्या ४ सेकंदांत त्या महिलेने ती वस्तू ठेवली. आजूबाजूला पोलिस कर्मचारी असतानाही तिला कुणी अडवले कसे नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

करुणा शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वीच आपण थेेट परळीत पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले होते. रविवारी पोलिसांनी परळीत बंदोबस्त वाढवला होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करुणा शर्मा परळीत दाखल झाल्या. त्यांनी वैद्यनाथ मंदिर परिसरात येऊन वैद्यनाथाच्या पायरीचे दर्शन घेतले. करुणा शर्मा वैद्यनाथ मंदिरात येताच त्यांना काही महिलांनी विरोध केला. त्यामुळे गोंधळ उडाला. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी करुणा व त्यांच्या मुलाला सुरक्षेच्या कारणास्तव परळी शहर ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांच्या कारची तपासणी केली गेली. त्यामध्ये पिस्टल आढळून आले. पोलिसांनी करुणा यांना ताब्यात ठेवले असून त्यांची चौकशी उशिरापर्यंत सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...