आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठडी:पिस्तुल प्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कालच केला होता परळीचा वादग्रस्त दौरा

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी अरुण मोरे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राज्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या करुणा शर्मा आता या वेगळ्या झाल्या आहेत. त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दरम्यान रविवारी त्यांनी परळीचा वादग्रस्त दौरा केला. त्यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडले होते. या प्रकरणी आता करुणा शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज न्यायालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

आरोपी अरुण मोरे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसामध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

करुणा शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वीच आपण थेट परळीत पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले होते. रविवारी पोलिसांनी परळीत बंदोबस्त वाढवला होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करुणा शर्मा परळीत दाखल झाल्या. त्यांनी वैद्यनाथ मंदिर परिसरात येऊन वैद्यनाथाच्या पायरीचे दर्शन घेतले. करुणा शर्मा वैद्यनाथ मंदिरात येताच त्यांना काही महिलांनी विरोध केला. त्यामुळे गोंधळ उडाला. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी करुणा व त्यांच्या मुलाला सुरक्षेच्या कारणास्तव परळी शहर ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांच्या कारची तपासणी केली गेली. त्यामध्ये पिस्टल आढळून आले. पोलिसांनी करुणा यांना ताब्यात ठेवले आणि त्यांची चौकशी उशिरापर्यंत सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...