आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटका:कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या सहा जनावरांची केली सुटका ; तिघांवर गुन्हा, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार गायींसह ६ गुरे वाहनातून कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडून त्यांची सुटका केली. पथकाने वाहनासह ६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करून एकास ताब्यात घेतले. साळेगाव (ता. केज) च्या बाजारातून खरेदी केलेल्या ४ गायी, १ कालवड, १ गोरे अशी जनावरे एका वाहनात भरून सायगाव (ता. अंबाजोगाई) येथे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती एएसपी कुमावत यांना मिळाली. त्यावरून पथकाने गुरुवारी केज शहरातील शिवाजी चौकात सापळा लावून वाहन (एमएच २३ एयू ३३३२) पकडले. पथकाने वाहनचालक तौफिक अल्ताफोद्दीन शेख (रा. नेकनूर, ता. जि. बीड) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता मोसीम शेख (रा. सायगाव) व सलीम (रा. घाटनांदूर, ता. अंबाजोगाई) यांच्या सांगण्यावरून घेऊन जात असल्याचे सांगितले. पथकाने ४ गायी, १ कालवड, १ गोऱ्हे व एक वाहन असा ६ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जमादार बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादीवरून तौफिक शेख, मोसीम शेख, सलीम यांच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल केला. तौफिक शेखला अटक केली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत.

बातम्या आणखी आहेत...