आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण:केज तालुक्यातील मुलीचे अपहरण; तरुणावर गुन्हा

केज6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत गेलेल्या दहावीच्या अल्पवयीन मुलीचे सहा दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आल्याची घटना केज तालुक्यातील नांदूरघाट येथे घडली. याप्रकरणी शनिवारी तरुणावर केज पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. केज तालुक्यातील पवारवाडी येथील अल्पवयीन मुलगी तालुक्यातील नांदूरघाट येथील एका शाळेत १० वीच्या वर्गात शिक्षण घेते. नेहमीप्रमाणे मुलगी व तिची लहान बहीण अशा दोघी ४ ऑगस्ट रोजी सकाळी रिक्षाने नांदूरघाट येथे शाळेत आल्या होत्या. काही वेळाने डोके दुखत असल्याने वडिलांना बोलावून घेऊन घरी जाणार असल्याचे या मुलीने आपल्या लहान बहिणीला सांगितले होते. शाळा सुटल्यावर दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास लहान बहीणही घरी आली. मात्र मोठी बहीण शाळा सुटल्यानंतर घरी न आल्याचे लहान बहिणीने तिच्या आईवडिलांना सांगितले. दरम्यान, रत्नदीप सुभाष जाधव (रा. वाघेबाभूळगाव, ता. केज) याने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने केज पोलिसांत दिली.

बातम्या आणखी आहेत...