आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउचलीच्या पैशावरून ऊसतोड मजुराच्या पत्नीचे गावातून मुकादमाने जीपमध्ये बळजबरीने बसवून कारखान्यावर अपहरण केल्याच्या तक्रारीवरून मुकादम दाम्पत्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सातेफळ येथील ऊसतोड मजूर राजेंद्र किसन सोनवणे यांनी गेल्या वर्षी धारूर येथील मुकादम अशोक पाटूळे यांच्याकडून उचल घेऊन काम केले होते.
मात्र १९ सप्टेंबर २०२२ रोजी सोनवणे हे बाजारासाठी गेले होते. त्यानंतर मुकादम अशोक पाटूळे व त्यांची पत्नी कल्पना पाटूळे या दोघांनी घरी येऊन उसतोडीसाठी चल नसता पैसे दे असे म्हणत अनुसया सोनवणे हिला जीपमध्ये बसवून कारखान्यावर नेले. यानंतर सोनवणे यांनी त्यांना फोनवरून विचारणा केली असता ऊसतोडणीच्या उचलीचे ३० हजार रुपये दे आणि तुझ्या पत्नीला घेऊन जा असे सांगितले. त्यावर सोनवणे हे सांगली येथील वसंतदादा कारखान्यावर गेले असता पैसे घेऊन आल्यावर तुझ्या पत्नीला तुझ्यासोबत पाठवतो असे म्हणत पैसे घेऊन परत ये, तसा परत आला तर जीवे मारू अशी धमकी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.