आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तन:दिवंगत प्राचार्य भारती बांगर यांच्या स्मृती दिनानिमित्त जाधव महाराज यांचे कीर्तन

गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई शहरातील इंदिरा गांधी इंग्लिश स्कूलच्या दिवंगत प्राचार्या भारती बांगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने शनिवारी अर्जुन महाराज जाधव यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील आप्तेष्ट, नातेवाईक उपस्थित होते.गेवराई शहरात पहिली इंग्रजी शाळा १९९१ मध्ये भारती बांगर यांनी सुरु केली होती. दरम्यान मागील वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

यावेळी जाधव महाराज यांनी आपल्या किर्तनातुन भारती बांगर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी भजन गायक तुळशीराम आतकरे, मृदंग विशारद दत्ता सटले, संगित विशारद संजय देवकर, हार्मोनियम वादक उत्तम मोटे यांनी साथ दिली. माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे, डॉ. दैववान बांगर, सुरेशचंद्र राका, सचिन जाधवर व विविध क्षेत्रातील आप्तेष्ट, नातेवाईक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...