आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध मागण्या:किसान सभा व माकपचे शुक्रवारी धरणे आंदोलन ; शेतकरी मोठया संख्येने सहभागी

परळी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, बांधकाम कामगारांना २० हजार बोनस द्यावा यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता.२५) परळी तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी व बांधकाम कामगारांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभा व माकपच्या वतिने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना खरीप २०२२ चा पिकविमा सरसगट देण्यात यावा. शेतक-यांना २०२२ खरीप हंगाम अग्रीम तात्काळ वाटप करा. अतिवृष्टी नुकसानीचे वाटप तात्काळ करावे, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये,नागपिपरी येथील सबस्टेशनचे काम त्वरीत सुरू करावे,नागापुर येथील सबस्टेशन मधील संच तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन होणार आहे तर माकपा परळीच्या वतीने बांधकाम कामगारांना २० हजार रुपये बोनस दयावा, योजनेचे लाभ अर्ज मिळाल्यावर एक महिन्याच्या आत द्यावा, २०२२ पर्यंत सर्वांना घरे या मोदी सरकारच्या घोषणेच अंमलबजावणी करावी, अतिक्रमीत, पडीत जमीन, गायरान जमिनी देवस्थान व गावठाणच्या जमिनीवर राहणारे शेतकरी यांचे नावावर करावी या विविध मागण्या घेऊन आंदोलन होणार आहे. या आंदोलनात शेतकरी व बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन बी.जी. खाडे, कॉ. पांडुरंग राठोड, मुरलीधर नागरगोजे, गंगाधर पोटभरे, परमेश्वर गीत्ते, सुदाम शिंदे, विष्णु देशमुख, पप्पु देशमुख, मदन नागरगोजे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...