आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांनी परीक्षेतील पेपर सोडवल्यास अनुभवाने त्यांच्या मनातील भिती निघून जाते. त्यासाठी मनाची एकाग्रता वाढवली पाहीजे. आपण घडलो तरच राष्ट्र घडू शकते. विद्यार्थिदशेत प्राप्त केलेले ज्ञान भविष्यात मोलाचे ठरते.ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे असे प्रतिपादन अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांनी केले.
अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त शनिवारी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रमुख पाहुणे गौरीशंकर स्वामी हे बोलत होते. अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शिवाजीराव कराड, प्राध्यापक नागनाथ गरजाळे, संस्थेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव लोमटे, ॲड. संतोष पवार, मुख्याध्यापिका अपर्णा पाठक, उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, पर्यवेक्षक रवी मठपती विवेकानंद कुलकर्णी,पर्यवेक्षक सुभाष शिंदे ,शिक्षक प्रतिनिधी भागवत मसने, गणेश कदम, संमेलनाचे प्रमुख वैशाली भुसा, शिवकन्या सोळुंके, विद्यार्थी संसदेचे उपाध्यक्ष प्रणव रामदासी, सचिव सुशांत संगापुडे आदी उपस्थित होते.
थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व बीड जिल्ह्याचे माजी खासदार बाबासाहेब परांजपे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अध्यक्षीय समारोपात ॲड.शिवाजीराव कराड यांनी बोलतांना सांगीतले की, स्नेहसंमेलन म्हणजे आनंदाचा सोहळा असून विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहावे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची सांगड घालून आदर्श संस्था आणि विद्यार्थी निर्माण केल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अपर्णा पाठक तर सूत्रसंचालन सहशिक्षक बालाजी मसने, प्रतीक्षा गंगणे, सुचिता कडके यांनी केले. आभार रवी मठपती यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.