आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्म:कलियुगात भगवंताच्या प्राप्तीचे ज्ञान; सतत चांगले कर्म करा निश्चित फळ मिळेल

बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलियुगात भगवंताच्या प्राप्तीचे ज्ञान, योग, कर्म व नाम ही साधने सांगितली आहेत. या पैकी नाम या बियांच्या फळाने अंत:करणातील विकार जावून दु:ख जाते व केवळ मोक्ष मिळतो, असे प्रतिपादन संजय महाराज पाचपोर यांनी श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे कीर्तन प्रसंगी केले. बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे सदगुरु श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त महादेव महाराज चाकरवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील ४थे कीर्तन संजय महाराज पाचपोर यांनी गुंफले. ‘शूद्ध बीजापोटी / फळे रसाळ गोमटी’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे त्यांनी निरुपण केले.

पाचपोर महाराज म्हणाले , मानसाला चांगल्या फळाची इच्छा असेल तर कर्मही चांगले करावे लागेल. सतत चांगले कर्म करत रहा निश्चित त्याला चांगले फळ आल्याशिवाय राहणार नाहीत. माऊली दादा हे परमार्थातील शुद्ध बी होते म्हणून नारायण भाऊ व महादेव तात्या हे शुद्ध फळ आहे. बी म्हणजे साधना आहे. प्रत्येक साधनेला फळ असते. संत हे या साधनेवर सतत आरूढ झालेले असतात. त्यांच्या मुखात अमृततूल्य शब्द असतात व देह हा देवा करिताच असतो. असे सर्वांगाने निर्मळ,शुद्ध असतात.त्यांचे चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र असते. त्यांचे चित्त विश्रांत पावलेले असते.आपणही त्यासाठी चाकरवाडीस येऊन माऊलीच्या सहवासात येऊन नाम व देह लावावा म्हणजे आपलेही अत्यंतिक दु:ख नाहिसे होऊन आपले जीवन कृतार्थ होईल असेही ते यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...