आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळे ज्योतीराव फुले यांना महात्मा होता आले तर ज्योतीराव फुले यांच्यामुळे सावित्रीमाईंना शिक्षण क्रांती करत आली. संबंध मानव जातीच्या कल्याणासाठी फुले दांपत्याने आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्यामुळेच क्रांती घडल्याचे प्रतिपादन सावता परिषद आयोजित अभिवादन सभेत प्रा.सुशीला मोराळे यांनी केले. सावता परिषदेच्या वतीने बीड येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली.जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा बनसोडे यांच्या पुढाकाराने जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण अभिवादन सभेत सामाजिक नेत्या प्रा.सुशीला मोराळे यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मा पुतळ्याच्या समोर अनेक स्पर्धांकांनी सहभाग घेऊन माई साविञीचा जीवन गौरव केला. सावता परिषदेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या अभिवादनसभेला पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे, मीना कांबळे, आशा गोरे, प्रा. शांता पवार, डॉ.राजश्री चौधरी, लक्ष्मणराव ढवळे, नामदेवराव दुधाळ, सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे, सचिन दूधाळ, प्रा.रणजित आखाडे, संतराम पानखडे, मोहनराव गोरे, शहराध्यक्ष ईश्वर राऊत, रमेश मदने, गणेश नांगरे, अलका आखाडे, डॉ.मोहिनी जाधव, संतोष निकाळजे, स्वाती आखाडे, स्वाती दूधाळ, मोहिनी आखाडे, मीना ढवळे, उर्मिला काळे, भाग्यश्री कडु, सारीका दूधाळ, सारिका जगताप, सोनाली ढवळे,सुरेखा आखाडे, सत्यभामा दूधाळ,मंदा चौधरी, लक्ष्मी आगरकर, सुलोचना आखाडे, नंदा साळुंके, साक्षी साळुंके, विष्णु यादव,गणेश यादव, मंदा खेञे, करूणा टाकसाळ, आकांशा खोबरे, कमल निंबाळकर, मीना शिंदे, शिवकन्या घोडके, सुरेखा शिंदे, मीरा राऊत, अमृता राऊत, मैना राऊत, मुख्याध्यापक सानप, शाहिद भगतसिंग विद्यालयाचे मोहन आघाव, राजेश परदेशी, वडमारे, हांगे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.