आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याच्या योग्य नियोजनामुळे १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या तीन महिन्यात ७ लाख २ हजार ६३६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून ५ लाख २५ हजार ८५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. याबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनेच्या वतीने कारखान्याचे व्यवस्थापक पारसनाथ जायसवाल, मुख्य शेतकी अधिकारी सुजय पवार, वरिष्ठ केन मॅनेजर दत्तात्रय आहेरकर, केन मॅनेजर भास्कर फपाळ, रामभाऊ सोळंके यांचा सत्कार केला.
उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, तालुका प्रमुख प्रभाकर धरपडे, मुंजाबा जाधव, अतुल उगले, दासुपाटील बादाडे, शिवाजी चव्हाण, सुखदेव धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पवारवाडी येथील खासगी तत्वावर असलेल्या जय महेश साखर कारखान्याने उस गाळपाची क्षमता वाढविली असून या गाळप हंगामामध्ये उस गाळपाचे नियोजन योग्य पद्धतीने केले आहे.
त्यानुसार उसतोड यंत्रणेच्या माध्यमातुन उसतोडणीचे काम सुरू आहे. यावर्षी झालेल्या अल्पशा पावसामुळे लागवड व खोडवा उसाला सरासरी तीस ते चाळीस टन प्रतिएकर पेक्षा अधिकचा उतार शेतकऱ्यांना मिळत नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उसाच्या वजनामध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जय महेश कारखान्याने प्रतिदिन उस गाळप क्षमता आठ हजार पाचशे मेट्रीक टन केलेली असून हा कारखाना प्रत्यक्ष आठ हजार दोनशे ते आठ हजार तिनशे मेट्ीक टन प्रतिदिन उसाचे गाळप करत आहे. १ नोव्हेंबर पासुन या कारखान्याच्या गाळप हंगामास प्रत्यक्ष सुरूवात झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.