आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:धारूर येथील महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये शेकडो स्पर्धकांचा सहभाग, कुलदीप चव्हाण प्रथम

धारूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर शहरात मोरया प्रतिष्ठान किल्ले धारूर यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पार पडलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

ऐतिहासिक किल्ले धारूर शहरात मोरया प्रतिष्ठान ही सामाजिक व युवकांसाठी काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिनी युवकांसाठी महा-मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा अमृत महोत्सव असल्याने ही स्पर्धा मोठ्या थाटामाटात झाली. स्पर्धकांनीही मोठा सहभाग नोंदवला. स्पर्धेची सुरुवात येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून धारूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय अटोळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. स्पर्धेची सांगता केज रोड स्थित टोल नाका येथे करण्यात आली. स्पर्धेचे बक्षीस वितरण धारूर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय नाट्यगृह येथे झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार प्रकाश घोपड, सुरेश फावडे, बिबीशन गायकवाड, संतोष सिरसट, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, माजी सभापती हनुमंत नागरगोजे, माजी उपनगराध्यक्ष अवेज खूरेशी, पत्रकार अनिल महाजन, सुरेश शेळके, विजयसिंह दिखत, सादेक इनामदार, दिनेश कापसे, परमानंद तोष्णीवाल, उपप्राचार्य गायकवाड, एपीआय बाश्टे, मोहन भोसले, सुमित डुबे, राजेश कदम, मंडळ अधिकारी नजीर कुरेशी, ग्रामसेवक तानाजी शिंपले, सुरेश शिंपले, अॅड. साजेद शेख, सुरज कोमटवार आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे पंच म्हणून सय्यद शाकेर, विजय शिनगारे, अतुल शिनगारे, प्रदीप भांगे, संदीपान तोंडे, मेजर दत्ता चोले, सूर्यकांत जगताप, नाना गायसमुद्रे, सचिन थोरात, वीरेंद्र अवस्थी, ज्ञानेश्वर शिंदे, चंदू चोले आदींनी काम पाहिले. सूत्रसंचालन नाथा ढगे यांनी, तर प्रास्ताविक मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील कावळे यांनी केले. आभार सचिन थोरात यांनी मानले.

चमकदार कामगिरी करणारे खेळाडू
या स्पर्धेत कुलदीप राज चव्हाण याने प्रथम क्रमांक, प्रदीप उदयसिंह राजपूत यांनी द्वितीय क्रमांक, अविनाश संजय पवार तृतीय क्रमांक, उत्तरेश्वर घुगे चतुर्थ क्रमांक, भक्तीदास वशिष्ठ क्षीरसागर यांनी पाचवा क्रमांक पटकावला. यासह इतर दहा खेळाडूंना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले

पुढच्या वर्षी होणार मुलीच्या मॅरेथॉन स्पर्धा
मोरया प्रतिष्ठान किल्लेधारुर यांच्या वतीने मागील सहा वर्षांपासून मुलांसाठी खुल्या महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. यामध्ये मोठ्या संख्येने खेळाडू सहभाग नोंदवतात. मात्र ही स्पर्धा केवळ मुलांसाठी असल्याने मुलींची स्पर्धा घ्यावी, अशी मागणी होत असल्याने पुढच्या वर्षी मुलांप्रमाणेच मुलींची ही महा मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचे मोरया प्रतिष्ठानने जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...