आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:श्रमिक मंचाचा उपक्रम; स्त्री‎ सक्षमीकरणाला उभारी देईल‎

बीड‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ शहरातील भगवान विद्यालय‎ परिसरात श्रमिक मंच, ग्रामीण‎ विकास केंद्राच्या वतीने महिला‎ वाहन चालक प्रशिक्षण व परवाना‎ वितरण कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात आले होते. श्रमिक मंचने‎ हाती घेतलेला उपक्रम हा स्त्री‎ सशक्तीकरणाला उभारी देणारा‎ आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी‎ डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.‎ ‎ डॉ.सारिका क्षीरसागर,‎ प्रा.वसंतराव ओगले, सीता मोरे,‎ आरती बनसोडे, भैय्यासाहेब मोरे,‎ रंजित बनसोडे, रतन गुजर, यांची‎ प्रमुख उपस्थिती होती.

पुढे‎ बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर‎ म्हणाले की, स्व.लोकनेत्या‎ केशरकाकू यांनी देखील स्वतः‎ शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरु केला‎ होता. त्या आशिया खंडातील‎ पहिल्या महिला साखर‎ कारखानदार होत्या. त्यांनी इंदिराजी‎ गांधी यांच्याकडून परवाननी घेऊन‎ कारखाना सुरु केला होता.‎ कोणत्याही महिलेने ठरवले तर‎ कुठलीच क्षेत्र हे स्त्रीसाठी अवघड‎ नसते, असेही डॉ.योगेश क्षीरसागर‎ यांनी सांगितले. यावेळी आदिनाथ‎ सोनवणे, भास्करराव कांबळे,‎ ज्योती शिरुरकर, बाबुराव गालफाडे‎ यांचा सत्कार करण्यात आला.‎ यावेळी नागरिक हजर होते.

बातम्या आणखी आहेत...