आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक परिस्थितीमुळे महिलांची कुचंबणा होते. बालविवाहासारखी कुप्रथा अजूनही सुरू आहे. हे थांबणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी केले. येथील योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी आणि श्रीमती कमल खुरसाळे स्मृती न्यास यांच्या विद्यमाने महिला आत्मभान शिबिराचे आयोजन केले. या कार्यक्रमात मनीषा तोकले यांनी आपली भूमिका मांडली.
तोकले म्हणाल्या, आजही महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. मुलींची छेड काढणाऱ्याला क्वचितच शिक्षा दिली जाते ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. मुलींनी यासाठी सक्षम बनले पाहिजे. वाड्या, वस्त्यांवरील स्त्रीला समजून घेतले पाहिजे, महिलांना आरोग्याच्या सुविधा पुरवल्या पाहिजेत. मुलींना संधी उपलब्ध करून देणे समाजाची जबाबदारी आहे असे मत मनीषा तोकले यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप संस्थेचे सचिव गणपत व्यास यांच्या संबोधनाने झाला. कार्यक्रमास अॅड. शिवाजीराव कऱ्हाड, प्रा. माणिकराव लोमटे, प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर, मुख्याध्यापक एस. के. निर्मळे, डॉ. प्रवीण भोसले, एस. पी. कुलकर्णी, मंगला लोखंड उपस्थित होते.
अंबाजोगाईतील आत्मभान शिबिरात व्याख्यानात विविध विषयांवर मार्गदर्शन
व्यास यांनी महिलांचा सन्मान वाढला पाहिजे असे मत व्यक्त केले. मुलींनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा असे आवाहन करताना कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सक्षम बनले पाहिजे असे मत या वेळी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.