आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:कर्परा नदीतील झाडे तोडून‎ भूमाफियांचा जागेवर कब्जा‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या पूर्वेला असणाऱ्या ऐतिहासिक‎ कर्परा नदी परिसरात झाडे तोडून भू माफियांनी‎ यावर कब्जा केला असून या प्रकरणी आम‎ आदमी पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला‎ आहे.‎ शहराच्या पूर्वेला असलेली कर्परा नदी ही‎ दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. पूर्वी नदी पात्र‎ मोठे व विस्तारीत होते मात्र आता हे पात्र‎ अरुंद झाले आहे. त्यातच नदीपात्रातील झाडे‎ तोडून भूमाफिया या ठिकाणी कब्जा करत‎ असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

असे‎ असतानाही प्रशासन मात्र बघ्याची भूमीका‎ घेत असून भू माफियांवर कोणतीही कारवाई‎ केली जात नसल्याचा आरोप आम आदमी‎ पक्षाकडून केला गेला आहे.‎ भक्ती कन्स्ट्रक्शन च्या पाठीमागे‎ पिंपरगव्हाण रोड या ठिकाणी संपूर्ण भागातील‎ रॉ मटेरियल आणून नदीपात्रात टाकण्यात येत‎ आहे. त्या नदीपात्रामध्ये असणारे मोठी जुनी‎ झाडे त्याची कत्तल करून भूमाफिया तेथेच‎ जाळण्याचे काम करत आहे.

यातून नदीपात्रात‎ कब्जा केला जात आहे. आम आदमी‎ पक्षाच्या सदस्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी‎ केली. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे,‎ जिल्हा सचिव रामधन जमाले, शहराध्यक्ष‎ सय्यद शाकेर, तालुका उपाध्यक्ष आजम‎ खान, शहर सचिव मिलिंद पाळणे यांच्यासह‎ इतरांची उपस्थिती होती. कारवाई न केल्यास‎ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.‎

बातम्या आणखी आहेत...