आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती परीक्षा:भूमी अभिलेख विभागाची भरती परीक्षा

बीड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी ९ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिध्द झालेल्या जाहिरातीनुसार ९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत उमदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. या अर्जदारांची २८ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२२ या कालावधीत अर्ज भरण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली होती.

छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपसणी करुन भूमी अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमानुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अहर्तेबात प्रमाणपत्र अपलेाड केलेले असून अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील ४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. परीक्षेच्य विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...