आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात दरवर्षी वीज, वादळी वाऱ्यासह पावसाने जीवित व वित्तहानी हाेते. मागील वर्षी अतिवृष्टी, वादळासह नैसर्गिक संकटात जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. त्यात गतवर्षी ८७४८ पशुपक्षी दगावले, तर ३२ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झालेली आहे. शेतात कामे करत असलेल्या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आणि जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना नियमित घडत असतात. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरणनिर्मिती होते, अशा वेळेस जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे जीवित व वित्तहानीपासून वाचता येऊ शकते.
वीज पडली तर हे अवश्य करा
तुमच्या आसपास अथवा एखाद्या व्यक्तीवर वीज पडली तर ताबडतोब वैद्यकीय मदत करा. श्वासोच्छ्वास थांबला असेल तर त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा.
हृदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा उपयोग करावा. नाडीचा ठोका चालू असेल आणि श्वासोच्छ्वास चालू असेल, तर इतर काही जखमा अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा याबाबत नोंद करा. दृष्टी ठीक आहे का, ऐकू येते का, यासह इतर हालचालींची नोंद घ्या.
वीज, वादळी पावसाने हानी, ८७४८ पशुपक्षी दगावले
एप्रिल ते १२ ऑक्टोबर २०२१ मधील जीवितहानी
एकूण जनावरे ६८५
एकूण पक्षी ८०२०
वीज पडून मृत ०८
पुरात वाहून २१
इतर कारणाने मृत ०३
एकूण मृत व्यक्ती ३२
जखमी व्यक्ती १०
पक्क्या घरांचे पडझड ५१
अंशतः घरांची पडझड ४५८६
(स्रोत : जिल्हाधिकारी कार्यालय )
दामिनी ॲप इन्स्टाॅल करून राहा सतर्क
वीज पडणे या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे, जेणेकरून जीवित व वित्तहानीचे प्रमाण कमी करता येईल. स्मार्टफोन असल्यास त्यात दामिनी ॲप इन्स्टाॅल करावे आणि त्यावरील सूचनांनुसार येणाऱ्या संकटापासून सावध राहावे. - राधाबिनोद शर्मा, जिल्हाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.