आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पीआय वाघ यांच्या नेतृत्वात एलसीबीची कामगिरी; आव्हानात्मक गुन्ह्यांचा लावला छडा

बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांना तपासासाठी आव्हानात्मक गुन्ह्यांचा छडा लावण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील काही दिवसांपासून सातत्य राखले आहे. ही कामगिरी केली.

मागील २ महिन्यात जिल्ह्यात पोलिस दलाला तपासाचे आव्हान देणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना घडल्या. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सर्व गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केले. शिरुर तालुक्यातील आनंदगाव खून प्रकरण, केजमधील वाहनधारकांच्या लुटीचे प्रकरण, दुचाकी चोरांची टोळी गजाआड करुन पकडलेल्या ११ दुचाकी, माजलगाव गोळीबार प्रकरणात काही तासांत अटक केलेले आरोपी, गर्भलिंग निदान प्रकरणात अटक केलेला डॉक्टर, बीड ग्रामीण हद्दीत अपघातचा बनाव करुन १ कोटींच्या खंडणीसाठी पतीचा खून करणाऱ्या पत्नी व साथिदार यांचा केलेला पर्दाफाश असे गुन्हे एलसीबीने समोर आणले आहेत.

तत्कालीन एसपी पंकज देशमुख विद्यमान एसपी नंदकुमार ठाकूर, एएसपी सुनिल लांजेवार यांचे मार्गदर्शन आणि एलसीबीमधील एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे, पीएसआय भगतसिंह दुल्लत, पीएसआय संजय तुपे व खबऱ्यांचे नेटवर्क असलेले अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे हे काम झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...