आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयोत्सव:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात; विधान परिषद विजयाबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांचा अंबडमध्ये विजयोत्सव

अंबडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आल्याबद्दल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली अंबड तालुका भाजपच्या वतीने फटाके फोडून, पेढे वाटून घोषणाबाजी करत जल्लोष केला.

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष दीपक ठाकूर, गटनेते अरुण उपाध्ये, औदुंबर बागडे, रमेश शहाणे, बाळासाहेब तायडे, सौरभ कुलकर्णी, संदीप खरात, बाळू शहाणे, तारेख चाऊस, डॉ.नंदकिशोर पिंगळे, सुरेश गुडे, संदीप खरात, फेरोज शेख, बाळू खरात, नसीर बागवान, द्वारकादास जाधव, प्रदीप पवार, बाबूराव खरात, पांडू शिंदे, संजय राठोड, राहुल मुंजाळ आदी उपस्थित होते.