आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनसहयोग:छपराला गळती : दानशूरांकडून आजीबाईंना पत्रे देत जनसहयोग

अंबाजोगाई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाईच्या समतानगरमध्ये राहणाऱ्या सखुबाई दिगंबर कसबे या निराधार महिलेने काठी टेकवत टेकवत येथील जनसहयोग कार्यालय गाठले. ‘माझ्या छपरावरचे जुने पत्रे पावसात गळताहेत, मला निवारा नाही, मला दोन नवे पत्रे द्या, नाही तर मी इथून उठणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. तेव्हा ‘जनसहयोग’चे कार्यकर्ते श्याम सरवदे यांनी दानशूरांच्या मदतीतून त्यांना पत्रे उपलब्ध करून दिले आणि आजीबाईंची पावसाळ्यात हाेणाऱ्या त्रासापासून सुटका झाल्याने त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.

सखुबाई कसबे यांना मानवलोक जनसहयोगमार्फत प्रत्येक महिन्याला किराणा दिला जातो. काही दिवसांपूर्वी त्या येथील जनसहयोगच्या कार्यालयात गेल्या. “मला महिन्याला तुम्ही खायला देता त्यामुळे मी आतापर्यंत जगले. मला राहायला एक खोली हाय, पण त्यावरील दोन जुने पत्रे गळके आहेत.

त्यामुळे निवाऱ्यासाठी मला दोन पत्रे द्या, तुम्हीच सांगा मी काय करू, तुम्ही दोन पत्रं दिले तर ठीक....नाही तर या हापिसाच्या दारातून मी उठणार नाही, या हापिसाशिवाय मला कोण हाय,’ अशी व्यथा सखुबाई यांनी मांडली होती. आजीबाईची ही व्यथा एेकून श्याम सरवदे यांनी त्यांच्या घरी जाऊन तेथील अवस्था पाहिली तेव्हा त्यांना घरावर पत्र्यांची गरज असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत आजीबाई जनसहयोगच्या कार्यालयासमोरच बसून होत्या.आजीबाईंची ही परिस्थिती सरवदेंनी काही जणांना सांगितली. तेव्हा दोघांनी एक-एक पत्रा देण्याची इच्छा व्यक्त केली. हे पत्रे एका निराधार आजीला देण्यात येत असल्याचे दुकानदाराला समजले तेव्हा दुकानदारानेही पत्रे पोच करण्याचे गाडीचे भाडेही दिले. नवीन पत्रे घरी येताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. गल्लीतील तरुणांनी हे पत्रे रिक्षातून खाली उतरवले व एका गवंड्यामार्फत पत्रे बसवून दिलेत.

डॉ. लोहियांची आठवण
अंबाजोगाईच्या मानवलोककडून निराधारांच्या खूप अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी अनेक दानशूरही शब्द टाकला की पुढे येतात. वंचित व गरजूंना मदत व साहाय्य करण्याची ही शिकवण कै. डॉ. द्वारकादास लोहियांनी मानवलोक व समाजात रुजवली आहे. त्यांची आठवण झाल्याचे श्याम सरवदेंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...