आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुक:कडा ग्रामपंचायत आरक्षण सोडत

कडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर केली. मंडळ अधिकारी प्रियंका घोडके, तलाठी नवनाथ औंधकर, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे यांच्या उपस्थितीत ही सोडत झाली. एकूण १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

प्रभाग एकमध्ये २ जागा असून दोन्ही खुल्या असणार आहेत. प्रभाग दोनमध्ये ३ जागा असून यातील १ ओबीसी महिला राखीव, १ एससी महिला आणि १ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग तीनमध्ये ३ जागा असून १ एससीसाठी राखीव, १ सर्वसाधारण महिलेसाठी तर १ खुली आहे. प्रभाग चारमध्ये ३ जागा असून १ ओबीसी, १ सर्वसाधारण महिलेसाठी, तर १ सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. प्रभाग ५ मध्ये ३ जागा असून २ सर्वसाधारण, तर १ ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग ६ मध्ये ३ जागा असून १ ओबीसी महिला, १ सर्वसाधारण महिला तर १ सर्वसाधारण गटासाठी.

बातम्या आणखी आहेत...