आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबागपिंपळगाव ते सावरगाव या रस्त्याच्या डाबंरीकरणाचे काम चालू आहे. बागपिंपळगाव ते सुर्डीपर्यंत डाबंरीकरण झाले आहे. याच रस्त्यावरील टाकरवणजवळील रामनगर येथील ओढ्यावरील पूल न बाधताच या ठिकाणी रस्ता केला आहे. अतिशय जीर्ण आणि अरुंद पूल असा हा पूल वाहतुकीस धोक्याचा आहे. असे असतानाही संबंधित कॉन्ट्रक्ट कंपनीने हा पूल न बनवताच यावर डाबंरीकरण केले आहे. या पूलाचे काम करण्याची मागणी होत आहे.
बागपिंपळगाव ते सावरगाव रस्ताच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी देण्यात आलेला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचे उद्घाटन केले होते. बागपिंपळगाव ते सुर्डी नजीकपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. तेथून सावरगावपर्यंतचे काम रखडले आहे. पूर्वी हा रस्ता अरुंद होता, आता रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. या रस्त्यावरील अनेक पुलांची कामे झाली असली तरी संबंधित गुत्तेदार कंपनीने टाकरवनजवळील रामनगर येथील ओढ्यावरील पुलाचे काम न करताच रस्त्याच्या डाबंरीकरणाचे काम केले आहे. पूल न बाधंल्यास वाहतुकीसाठी धोक्याचा ठरू शकतो. संबंधित पूल का नाही झाला याबद्दल नागरिकात शंका निर्माण झाली आहे. गुत्तेदाराने भ्रष्टाचार केला की काय? या चर्चेला नागरिकांत उधाण आले आहे. हा पूल बांधण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या संदर्भात संबंधित काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून पुलाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी होत आहेत. दरम्यान, संबंधित काही अधिकाऱ्यांनी या पुलास निधी अाला नसल्याचे सांगितले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.