आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल दिन:सायकल रॅलीतून दिली कायदेविषयक माहिती ; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडून आयोजन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक सायकल दिनाच्या औचित्यावर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय परिसरातून निघालेली सायकली रॅली अण्णा भाऊ साठे चाैक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे व जिल्हा न्यायालयाजवळ विसर्जित झाली. या रॅलीत सहभागी झालेल्या चंपावती विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, विधीदूतांसह नागरिकांनी अपापल्या सायकलींवर विविध कायदेविषयक माहितीदर्शक फलके लावण्यात आली होती. तसेच सायकलींवर ध्वनिक्षेपकाद्वारे सर्वसामान्यांच्या हक्कांविषयी माहिती देणारे गीत व जिंगल ध्वनिक्षेपित केली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ‘किमान समान’ कार्यक्रमांतर्गत प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यू. टी. पोळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली काढली. रॅलीत प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. टी. पोळ होते. तर प्रभारी सदस्य सचिव पी. व्ही. कुलकर्णी, तत्त्वशील कांबळे, अशोक तांगडे, सचिन तपसे, जोतिराम घुले, संघनायक भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ, चंपावती विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी सहभागी होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक बी. बी. झंवर यांनी आभार मानले. रॅली यशस्वितेसाठी चंपावती विद्यालय शिक्षक-विद्यार्थी-विद्यार्थिनी, विधिदूत, पोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केले.

हिरवी झेंडी दर्शवून सायकल रॅली करण्यात आली मार्गस्थ प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. टी. पोळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पी. व्ही. कुलकर्णी यांनी सायकल रॅलीस हिरवी झेंडी दर्शवून सायकल रॅली मार्गस्थ केली. जिल्हा न्यायालय इमारत परिसरात विधी सेवा प्राधिकरण कायद्यातील महत्त्वाची माहिती व आरोपीचे हक्क दर्शवणारे बॅनर लावण्यात आले व या संदर्भातील पॉम्पलेट्स वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...