आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याची दहशत:गडचिरोलीत 55 वर्षीय व्यक्तीवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; अर्धवट खाललेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

गडचिरोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची आष्टी परिसरातील ही दुसरी घटना आहे.

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील इल्लूर येथे बिबट्याने एका इसमावर हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. शंकर गंगाराम चिताडे ५५ रा. इल्लूर ता. चामोर्शी असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. एका महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची आष्टी परिसरातील ही दुसरी घटना आहे.

गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास इसम इल्लूर गवशेजारील जंगलात सरपणासाठी गेला होतो. रात्र होऊनही सदर इसम घरी परत न आल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी शोधाशोध करण्यास सुरूवात केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून ठार केल्याचे उघडकीस आले.

या परिसरात बिबट्याचे मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. आष्टी येथील इल्लूर पेपर मिल काॅलनीत १२ सप्टेंबर रोजी एका आठ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. या घटनेच्या तीन दिवसानंतर १५ सप्टेंबर रोजी आष्टीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या कंसोबा मार्कण्डा जंगल परिसरात एका सात वर्षीय मुलाला ठार केले. २९ सप्टेंबर रोजी याच परिसरात बिबट्याने एका महिलेस जखमी केले. या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरु असून या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. परंतु वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून बिबट्याला जेरबंद न केल्यास मनुष्यहानी कमी होणार नाही हे नक्की.

बातम्या आणखी आहेत...