आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड जिल्ह्यात बिबट्याची दहशत:आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत सुरूच, शेतातून गवत आणताना 51 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आष्टी तालुक्यात नरभक्षी बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत तीन जण ठार

आष्टी-तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा हल्ला सुरूच असून, आज रविवार दि.29 रोजी सकाळी साडेदहा वाजताच तालुक्यातील पारगांव जोगेश्वरी येथील शालन विश्वास बोराडे (वय 51) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्यांना तत्काळ आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविले.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पारगांव जोगेश्वरी येथील शालन शहाजी भोसले ह्या आपल्या शेतातून गुरांना गवत घेऊन येत असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारील लोकं पळत आल्याने बिबट्याने तेथून धुम ठोकली आहे. उपस्थित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन बिबटे पाहिले असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरील महिलेच्या गळ्याला बिबट्याचे दात लागले असून, त्या महिलेवर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याची हल्ला केल्याची माहिती वनविभागाला समजताच त्यांची टीम पारगावात पोहोचली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser