आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनक्षोभ:अहमदनगरमधून घुसखोरी केलेल्या बिबट्याची बीड जिल्ह्यात दहशत, गोळ्या घालण्याची मागणी

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिबट्याच्या हल्ल्यात मृत महिलेवर सोमवारी अंत्यसंस्कार झाले. घरी शोकाकूल वातावरण होते. - Divya Marathi
बिबट्याच्या हल्ल्यात मृत महिलेवर सोमवारी अंत्यसंस्कार झाले. घरी शोकाकूल वातावरण होते.

तालुक्यातील नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तीन जणांचे बळी घेतले आहेत तर, तिघांना जखमी केले आहे. दरम्यान, वन विभागाच्या माहितीनुसार हा बिबट्या नगर भागातून स्थलांतरित झाला आहे. तीन तालुक्यांतून त्याने प्रवास केला असून मानवी रक्ताची चटक लागल्याने या संपूर्ण प्रवासात प्रत्येक ठिकाणी माणसांवर हल्ला केला आहे. या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घाला अशी जनभावना आष्टीत आहे. तर, बिबट्याला पकडण्यात अपयशी वन विभागावरही पकडण्यासाठी मोठा दबाव आहे.

आष्टी तालुक्यात सुर्डी, पागराव, मंगरूळ, किन्ही, पारगाव परिसर दहशतीखाली आहे. दरम्यान, हा बिबट्या आला कुठून याची चर्चा आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यात एक नरभक्षक बिबट्या सक्रिय होता. तोच हा बिबट्या असावा पाथर्डी तालुक्यातून तो भगवानगडाच्या पायथ्याशी आला तिथे काही शेतकऱ्यांवर त्याने हल्ला केला. त्यानंतर तो शिरूर तालुक्यात आला मानूर परिसरात जाटवडमध्ये महिलेवर हल्ला केला आणि त्यानंतर तो आष्टी तालुक्यात अाला इथे त्याने तीन बळी घेत तीन जण जखमी केले आहेत.

आष्टीत लोकांमध्ये राग
बिबट्याला पिंजरा किंवा बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन पकडण्याचे प्रयत्न वन विभाग करत आहे. अद्याप बिबट्याला बेशुद्ध करण्याचा साधा प्रयत्नही वन विभागाला करता आलेला नाही. त्यामुळे आता बिबट्या दिसताक्षणी थेट त्याला गोळ्या घालून ठार करा, अशी जनभावना आष्टीत आहे.

पारगाव शिवारात ठशांच्या आधारे अधिकारी-कर्मचारी घेताहेत शोध
पारगाव शिवारात सोमवारी सकाळी पुन्हा बिबट्याचे ताजे ठसे मिळाले आहेत. त्या आधारे वन विभाग बिबट्याचा शोध घेत आहेत. कोम्बिंग ऑपरेशन करून बिबट्याला सर्व बाजूंनी वन विभाग घेरण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच बिबट्याला पकडण्यात यश येईल सर्वताेपरी प्रयत्न सुरू असल्याचे विभागीय वन अधिकारी मधुकर तेलंग आणि अमोल सातपुते यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser