आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:‘चला, जाणूया नदीला’ अभियान

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत राज्यभरातील किमान ७५ नद्यांवर नदी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यासह उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातून वाहत येणारी मांजरा नदीचा समावेश आहे. या यात्रेत नदी खोऱ्यांचे नकाशे, पूररेषा, पर्जन्याच्या नोंदी, गेल्या पाच वर्षांतील पूर व दुष्काळाच्या नोंदी संकलित करण्यात येतील. आज बुधवार पासून पाटोदा तालुक्यातील मांजरा नदीच्या उगमापासून या अभियानाला सरुवात होणार आहे. नद्यांमध्ये असलेल्या गाळामुळे वहन, साठवण क्षमता कमी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नदीला जाणून घेणे व तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...