आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्री दिन:‘माणुसकीचा दीप तेवत ठेवू अन् दुःख आपण थोडे वाटून घेऊ’ ; बालिका आश्रमामध्ये कविसंमेलन

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील छत्रपती संभाजीनगर येथील भगवान बाबा बालिका आश्रमात मैत्री दिनाचे औचित्य साधून साहित्ययात्री परिवाराच्या संचालिका सुरेखा येवले यांनी काव्यसंमेलनाचे आयोजन केले होते.बालिका आश्रमाच्या संचलिका कविता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली बालिका आश्रमातील नवोदित बाल कवयित्री व मान्यवर कवयित्रीनी सहभाग नोंदवला. कवयित्री संमेलनात बालकाच्या भावविश्वाशी निगडित कवितांचे सादरीकरण कवयित्री आरती परळकर संगीता, प्रभावती राऊत, राजश्री ढाकणे, पुष्पा खाडे ,मनीषा खाडे यांनी केले. आश्रमातील बाल कवयित्र देवकी कोरडेची ‘मनात जे असते तसे चित्रात दिसते’ ही कविता मनाचा ठाव घेणारी होती.बालकवींच्या वेगवेगळ्या भाषेतील बालगीतांनी काव्य संमेलनात रंगत आणली.

कवयित्री आरती यांनी ‘उठ उठ तुला लढायच लढायच’ हे स्फूर्ती गीत सादर केले. राजश्री ढाकणे यांनी ‘मैत्रीच्या सुंदर गावात असते एकच जात’ ही कविता सादर केली. संगीता सपकाळ यांनी ‘तुझ्या सुखी स्वप्नांचे गाठोडे बांधले मी उराशी काव्य’ सादर केले. प्रभावती राऊत यांनी ‘ खुप खूप अभ्यास करुन यशाचे शिखर गाठा, नाही पडणार जीवनात कशाचा तोटा’ ही काव्य रचना सादर केली. पुष्पा खाडे यांनी ‘माणुसकीचा दीप तेवत ठेवू दुःख थोडे वाटून घेऊ’ ही हृदय स्पर्शी काव्य रचना सादर केली.संमेलनाच्या आयोजक सुरेखा येवले यांच्या ‘माझे भाग्य थोर पोटी जन्मली पोर व माय मराठी’ या कवितेने संमेलनाची सांगता झाली.

बालिका आश्रमाच्या प्रमुख कविता वाघ, ज्येष्ठ विस्तार अधिकारी पुष्पा खाडे, मनिषा खाडे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले.आरती परळकर यांनी सूत्रसंचलन केले. बालिका आश्रमास अनेक मदतीचे हात पुढे यावेत असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सुदाम नवले, डॉ तुषार शिंदे, रमाकांत येवले, बाळू कांबळे यांनी परिश्रम घेतले. या कवी संमेलनाला श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...