आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरळ मार्गांवरच जीवनाला ‘ब्रेक’:गेल्या 3 वर्षांत 78% अपघात अशाच रस्त्यांवर, 55 टक्के दुर्घटना अति वेगामुळे

अमोल मुळे | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ८६% अपघातातील मृत्यू अशाच रस्त्यांवर, राज्य महामार्ग पोलिसांचा अहवाल

सरळ रस्ता आणि वाहनाचा अति वेग जीवनाला ब्रेक लावणारा ठरत आहे. सन २०१८ ते २०२० या ३ वर्षांत राज्यात झालेल्या रस्ते अपघातांपैकी सर्वाधिक ७८ % अपघात हे सरळ रस्त्यावर आिण ५५ % अपघात अति वेगाने झाले आहेत. एकूण मृत्यूपैकी ८६ % मृत्यू सरळ रस्त्यांवरच्या, तर ५६ % मृत्यू अति वेगाने झालेल्या अपघातात झाले आहेत. राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

राज्यात मागील काही वर्षांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहेत. दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या सरळ महामार्गांवर वाहनधारकांना वेग मर्यादेचे भान राहत नसल्याने अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. सन २०१८ ते २०२० या तीन वर्षांमध्ये राज्यात १ लाख ८ हजार ६१६ रस्ते अपघात झाले. यामध्ये एकूण ३७ हजार ६१८ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातांपैकी तब्बल ८४ हजार ७६७ अपघात हे सरळ रस्त्यावर झाले. यामध्ये ३२ हजार ५४६ जणांचा मृत्यू झाला, तर अति वेगाने झालेल्या सुमारे ६० हजार अपघातात २१ हजार २५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ८७३ अपघातांत एकूण २६८ जणांचा बळी २०१८ ते २०२० या तीन वर्षांत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ८७३ अपघात झाले. यामध्ये २६८ जणांचा बळी गेला, तर ३९२ जण गंभीर जखमी झाले आणि ६७ जण िकरकोळ जखमी झाले आहेत.

2018 एकूण अपघात 35,717 एकूण मृत्यू 13,261 सरळ रस्त्यावर अपघात 27,021 सरळ रस्त्यावर मृत्यू 10,344 अति वेगाने अपघात 9,956 अति वेगाने मृत्यू 3,926

2019 एकूण अपघात 41,416 एकूण मृत्यू 12,788 सरळ रस्त्यावर अपघात 31,616 सरळ रस्त्यावर मृत्यू 9,871 अति वेगाने अपघात 25,487 अति वेगाने मृत्यू 8,175

2020 एकूण अपघात 31,483 एकूण मृत्यू 11,569 सरळ रस्त्यावर अपघात 26,130 सरळ रस्त्यावर मृत्यू 9,414 अति वेगाने अपघात 24,539 अति वेगाने मृत्यू 9,152

बातम्या आणखी आहेत...