आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई शाखेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांना जीवनगौरव पुरस्कार तर जगदीश शिंदे यांना स्व. मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार, नृसिंह सूर्यवंशी यांना स्व. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारीता पुरस्कार तर प्रा. बिबीशन चाटे यांना स्व. दत्ता शिंदे स्मृती पत्रकारीता पुरस्कार देऊन गाैरवण्यात आले. अंबाजोगाई येथील स्व. विलासराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख हाेते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा तर प्रमुख वक्ते म्हणून व्याख्याते संकेत कुलकर्णी हे उपस्थित हाेते. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, व्यंकटेश्वर शुगर इंडस्ट्रीयल प्रा लि. आंबा साखरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जंगम, डिजिटल मीडिया राज्य प्रमुख अनिल वाघमारे, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब पवार, अधिष्ठाता डाॅ. भास्कर खैरे आदी उपस्थित हाेते. कविता नेरकर म्हणाल्या, समाजाचे तळागाळातील प्रश्न मांडणे हे पत्रकारांचे काम असुन पत्रकार हा पूर्वग्रहदूषित नसावा.
यावेळी जीवनगौरव पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे म्हणाले, पत्रकार जे काही लिहितात त्यामागे अनेक वेदना दडलेल्या असतात. यावेळी बाेलताना पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख म्हणाले, या कार्यक्रमाचे नियोजन विचारमंथन व्हावे म्हणून केलेले आहे. या व्यासपीठावर अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. नंदकिशोर मुंदडा म्हणाले, पत्रकार समाजाचा आरसा आहे. बातमी ही अभ्यासपूर्ण असली पाहिजे व ती बातमी पत्रकारांनी स्वतः लिहिली पाहिजे, शिकलेल्या पिढी जातिवादाला जिवंत करायला लागली आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी दत्तात्रय अंबेकर यांनी कार्य अहवाल सादर केला. गजानन मुडेगावकर यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. राजेश इंगाेले यांनीही मनाेगत व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.