आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील; पिंपळवाडी ते भाळवणी रस्त्यावरील पुलासाठी 5 कोटी निधी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील पिंपळवाडी भाळवणी रस्त्यावरील बिंदुसरा नदीवर ५ कोटी रुपयांचे पूल बांधकामास मंजुरी मिळाली आहे. याची टेंडर प्रक्रीया पूर्ण झाली आहे.लवकरच हे काम सुरु करण्यात येणार आहे. पिंपळवाडी डोंगर पट्ट्यातील नागरिकांना सुलभ वाहतुकीसाठी बिंदुसरा नदीवरील पुलाची मागणी गेली अनेक वर्षापासून प्रलंबित होती. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सातत्याने प्रयत्न करून पुलाचा प्रश्न यशस्वी पणे मार्गी लावला.

या कार्याचे कौतुक पिंपळवाडीचे माजी उपसरपंच महादेव बहिरवाळ, विवेक पाखरे, रवींद्र कळसाने, यांनी ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र मस्के यांचा सत्कार करुन आभार व्यक्त केले.लिंबागणेश जिल्हापरिषद गटामध्ये यापूर्वी रस्त्याचा प्रश्न जटील होता. डोंगर पट्ट्याच्या या परिसरातील गाव खेड्यांना वाहतुकीसाठी रस्त्यांची अत्यंत दुरावस्था होती. दुध, भाजीपाला असे छोटे मोठे उद्योग या परिसरातील ग्रामस्थ करतात.पावसाळ्यात आणि पर्जन्यमान अतिरिक्त झाल्यास बिंदुसरा नदी ओलांडणे जिकरीचे होते. या कालावधीत उद्योगाला फटका बसतो. शिवाय अतिवृष्टीत जीवाला धोका निर्माण होतो.

यामुळे या पुलाचे काम मागील काळातच होणे अपेक्षित होते. परंतु सत्ता भोगूनही हा पूल करण्याचे धाडस प्रस्थापितांनी केले नाही.पंकजा यांचेही प्रयत्न राजेंद्र मस्के यांनी हा प्रश्न हाती घेतला. तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातुन मंजुरी मिळवली. या कामासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

डोंगर पट्ट्यातील ग्रामस्थ या कामामुळे समाधान व्यक्त करत आहेत. दरम्यान, हा पुल होऊ नये म्हणून काही विरोधकांनी टेंडर प्रक्रियेत ही अनेक पुढाऱ्यांनी खोड घालण्याचा प्रयत्न केला. सर्व अडचणीवर मात करत अखेर राजेंद्र मस्के यांनी पिंपळवाडी – भाळवणी बिंदुसरा नदीवरील पूल बांधकामास न्याय दिला. जनतेच्या हिताचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...