आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत निवडणुकीत ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लिंबुटा ग्रामपंचायतसाठी दाखल झालेले इतर अर्ज परत घेताच लिंबुटा ग्रामपंचायत बिनविरोध निवडली गेली. भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली सरपंच पदासह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
परळी तालुक्यातील लिंबोटा बिनविरोध निवडली गेली. भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत आत्तापर्यंत पाच वेळा बिनविरोध निवडली गेली असून त्यांच्यावरील विश्वास ग्रामस्थांनी पुन्हा कायम ठेवत पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिली आहे.
या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार दैवशाला सुधाकर बनसोडे यांच्यासह रवी गंगाधर कराड, सुरेखा सिद्धार्थ बनसोडे, अरुण वैजनाथराव मुंडे, छबीता जयराम मुंडे, स्वाती ऋषिकेश मुंडे, प्रकाश किसन राठोड व संगीता रमेश चव्हाण हे सर्व सात सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. फुलचंद कराड म्हणाले की, मी केलेल्या व करीत असलेल्या गावातील विकास कामावर गावकऱ्यांचा विश्वास आहे. आपण सगळ्यांना समान न्याय देतो. गावच्या पुनर्वसनापासून गावाच्या विकासाबाबत मी खूप कामे केली आहेत. त्यामुळेच जनता आपल्यासोबत असल्याचेही कराड यांनी सांगितले. दरम्यान लिंबुटा ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याचे समजताच सर्व विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक यांनी तहसील परिसरात फटाके वाजवत व गुलाल उधळत आनंद व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.