आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा वाढता संसर्ग:बीड जिल्ह्यात आणखी पाच दिवसाचे कडक लॉकडाऊन , आज मध्यरात्री पासुन 12 मे पर्यंत अंमलबजावणी

बीड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील सुभाष रोडवरील छायाचित्र  (फाईल फोटो) - Divya Marathi
बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील सुभाष रोडवरील छायाचित्र (फाईल फोटो)

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी या पूर्वी लागु केलेले तीन दिवसाचे कडक लॉकडाऊन आता बुधवार १२ मे पर्यंत पाच दिवस कायम केले असुन दवाखाने, मेडिकल ,पेट्रालपंप, टपाल सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यांनी दिले असल्याने येणाऱ्या पुढील पाच दिवस देखील जिल्ह्यात कडक लोक डाऊन असणार आहे. दरम्यान आज शुक्रवारी रात्री बारा वाजल्या पासुन हे लॉकडाऊन सुरू होत आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आज शुक्रवार ७ मे २०२१ रोजी दुपारी जिल्हाधिकारी जगताप यांनी लॉकडाऊनचे नवे आदेश काढले असुन आज शुक्रवार ७ मे २०२१ रोजी मध्यरात्री बारा वाजल्या पासुन लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरूवात होत असुन येत्या शनिवार ८ मे २०२१ ते बुधवार १२ मे २०२१ पर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे.

पाच दिवसाच्या काळात बीड जिल्ह्यात केवळ दवाखाने, मेडीकल,पेट्रोलपंप, टपाल कार्यालय,लसीकरण केंद्रे,वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मास्युटिकल्स कंपन्या,सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या अस्थापना वगळता इतर कोणत्याही अस्थापना सुरू राहणार नाहीत.अत्यावश्यक सेवेत मोडणारे अस्थापना किराणा दुकाने, चिकन ,मटन विक्रीची दुकाने, बेकरी व कृषीशी संबधीत पूर्ण बंद राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...